शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या निमित्त आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. बाळासाहेबांनी काय केलं हे एका वाक्यात सांगायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं काम बाळासाहेबांनी पुढं नेलं. बाळासाहेब नसते तर पाकिस्तानच्या सीमा महाराष्ट्रापर्यंत आल्या असत्या. बाळासाहेबांमुळे महाराष्ट्र महाराष्ट्र राहिला, हिंदुस्तान हिंदुस्तान राहिला. बाळासाहेबांच्या काळात पंतप्रधान कुणी असता तर शेतकरी आडवे आले म्हणून पंतप्रधान परत नसते गेले, अशी जोरदार टोलेबाजी राऊतांनी केलीय.
ना कोई जंग लढी है मैंने
ना खाना पिना छोडा है मैंने
बस अपनेही देश मै जिंदा लोट आया हूँ मैं
अपनेही लोगोंसे डरता हूँ मैं
काम ही ऐसा करता हूँ मैं
सारे देश को बेचकर जिंदा लौट आया हूँ मैं…